RY 23-24 First Gentleman Message
- Rtn Prasad Deshmukh

- Jul 5, 2023
- 1 min read
नमस्कार,
बघताबघता रो. शिपाद यांचे रोटरीइमॅजिनेशन चे वर्ष संपले. CSR सारखे भव्य उपक्रम, इंटरॅक्ट क्लब बरोबर उत्तमप्रोजेक्ट्स कॉफी शॉप आणिरुचकर मेजवानी यासर्व गोष्टींमुळे सरत्या वर्षात रो. श्रीपाद आणि रो. विनयायांनी सिमफोनीची सुरावट पक्की केली असं मी म्हणेन.
गत वर्षी जॉईंट सेक्रेटरी असताना CSR प्रोजेक्ट वर काम करायचीसंधी मिळाली. आपल्या क्लबला पहिल्यांदाच दोन CSR प्रोजेक्टची व्यवस्थापाहायची संधी रो. योगीताच्यापुढाकारने मिळाली.
रो.राममोहन आणि रो.विक्रमयांच्या मार्गदर्शनाखाली CSR प्रोजेक्ट यशस्वी रित्या पूर्ण करता आला याचामनस्वी आनंद आहे.
आता नवीन रोटरी वर्षात पहिल्यांदाच तीन महिला पदाधिकारी लाभलेल्या आपल्या क्लबला, रो. योगीता आणि टीम येत्या वर्षात ग्लोबल ग्रांट सारखे महत्वाकांक्षी उपक्रम करून नवीन उंचीवर नेतीलआणि त्यामुळे सिमफ़ोनीचा स्वरनाद पंचक्रोशीत दुमदुमणार याची मला खात्रीआहे.
या रोटरी वर्षात क्लब ऍडमिनिस्ट्रेशन ची जबाबदारी मिळाली असून वर्षभरात क्लबच्या सभासदांना निरनिराळ्या कार्यक्रमामार्फत फ्रेन्डशिप,फेलोशिप चा आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वकार्यक्रमाचे पूर्वनियोजन झालेअसल्यामुळे आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने पुढील वर्ष अतिशय उत्तमरित्या पार पडेल अशी आशा करतो.
मावळते अध्यक्ष रो . श्रीपाद, सचिव रो विनया आणि त्यांच्या BOD चे आभार.
तसेच उगवत्या अध्यक्षा रो. योगीता, सचिव रो.मीनल
आणि त्यांच्या BOD टीमला शुभेच्छा..









Comments